Pune Crime Video : पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, थेट २३ सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांना…
पुणे बलात्कार प्रकरणानंतर पुण्यातील स्वारगेट आगारातील तब्बल २३ सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. पुण्यात घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर मंत्री प्रताप सरनाईक हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरक्षेतील निष्काळजीपणा गांभीर्याने घेत मोठी कारवाई केली आहे. पुणे बलात्कार प्रकरणानंतर पुण्यातील स्वारगेट आगारातील तब्बल २३ सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. पुण्यात घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर मंत्री प्रताप सरनाईक हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आगारातून २३ सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्यानंतर नवीन सुरक्षारक्षक कर्मचारी नेमण्याचेही आदेश त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. यासोबतच परिवहन विभागाचे नियंत्रक आणि डेपो व्यवस्थापक यांची चौकशी करण्याचे आदेशही प्रताप सरनाईक यांच्याकडून देण्यात आल्यानंतर एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, सार्वजनिक वाहतूक करताना महिलांची सुरक्षा मजबूत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून नियम अधिक कडक केले जातील, असे प्रताप सरनाईक म्हणाले. तर अनेक वर्षांपासून निष्क्रिय पडलेल्या भंगार वाहनांकरता कठोर पावले उचलली जातील, असेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांनीही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आज मंत्रालयात या विषयावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

