Swargate Crime Video : स्वारगेट बस डेपोत चार जुन्या ‘शिवशाही’चं लॉजिंग? बेडशीट, साड्या अन् कंडोमची…, ठाकरेंच्या सेनेकडून सनसनाटी आरोपानं खळबळ
पुण्याच्या स्वारगेट एसटी स्टँडमध्येच बलात्काराची संतापजनक घटना घडली. शिवशाही बस मध्ये नराधमाने पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत दुष्कृत्य केलं. आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन करत वसंत मोरेंनी सुरक्षारक्षक कार्यालयाची तोडफोड केली. तसेच ज्या चार बसेसचं लॉजिंग करण्यात आलं तिथलं धक्कादायक वास्तव आता उघड केले.
पुण्यात एसटीच्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्काराची संतापजनक घटना घडली आणि त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. पुण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी स्वारगेट बस स्टँड परिसरामधील सुरक्षारक्षक कार्यालयाची तोडफोड केली. वसंत मोरेंनी आणखी एक पर्दाफाश केला आहे. ज्या स्वारगेटच्या एसटी बस परिसरामध्ये तरुणीवर बलात्काराची घटना घडली त्याच बस डेपोमध्ये जुन्या चार शिवशाही बसेसचं लॉजिंग करण्यात आले आहे. जिथे साड्या आणि कंडोमची पाकिटं पसरलेली आहेत. या बसमध्ये ही रोज गैरकृत्य होत असल्याचा सनसनाटी आरोप वसंत मोरेनी केला आहे. एसटी बस मध्येच 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्काराची घटना घडली आणि त्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली. दत्तात्रय गाडे हाच तो नराधम आहे ज्याने ताई म्हणून पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार केले आहेत.
नेमकं काय घडलं?
पुण्याचं स्वारगेट एसटी स्टँड पहाटे साडेपाच वाजले होते. तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडमध्ये आली आणि बसची वाट पाहत बाकावर बसली. त्याच वेळी नराधम दत्तात्रय गाडे तरुणीकडे आला आणि ताई म्हणून कुठे जायचं आहे अशी विचारणा केली. त्यावर तरुणीने फलटणला जायचं आहे असं सांगितलं. पण फलटणची बस या ठिकाणी नसून दुसरीकडे लागल्याचं गाडे म्हणाला आणि मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो असं म्हणत बसकडे घेऊन गेला आणि बस जवळ येताच बसमध्ये अंधार असल्याने तरुणी थांबली. पण रात्रीची बस असल्याने प्रवासी झोपल्याने लाईट्स बंद असल्याचं गाडे म्हणाला. त्यामुळे तरुणी बसमध्ये चढताच दार लावलं आणि नराधम दत्तात्रय गाडेन अतिप्रसंग केला. या घटनेनंतर तरुणी बस मधून उतरली आणि मित्राला फोन केला. मित्रानं तक्रार देण्यास सांगितल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीच्या मागे हा नराधम जात असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. ते फुटेज पाहूनच पुणे पोलिसांनी या दत्तात्रय गाड्याची ओळख पटवली. तो मूळचा शिरूरचा असून त्याच्यावर याआधी देखील गुन्हे दाखल आहेत.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत

