Shinde Shivsena Video : नीलम गोऱ्हेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं शिंदेंच्या शिवसेनेतही नाराजीचा सूर? आता पक्षाची भूमिका काय?
नुकत्याच झालेल्या दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात नीलम गोऱ्हे यांनी खळबळजनक विधान केलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं वक्तव्य करत नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीचा सूर पाहायला मिळत असल्याची सूत्रांची माहिती आहे. गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्याने पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा आहे. तर नीलम गोऱ्हेंनी स्वतः समोर येऊन केलेल्या वक्तव्यावर बोलावं अशी भूमिका पक्षातून व्यक्त होतेय. दरम्यान, नीलम गोऱ्हे लवकरच एकनाथ शिंदेंना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात नीलम गोऱ्हे यांनी खळबळजनक विधान केलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं वक्तव्य करत नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. यानंतर ठाकरेंची शिवसेना एकच आक्रमक झाली असून त्यांनी नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांनंतर संजय राऊत यांची जीभ घसरली असून त्यांनी नीलम गोऱ्हेंचा उल्लेख निर्लज्ज बाई आणि विश्वासघातकी असा केला. तर सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना आव्हान देत उद्धव ठाकरेंवर केलेला आरोप कोर्टात सिद्ध करा, नाहीतर नाक घासून माफी मागा, असं म्हटलंय.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

