तर खुलासा करा, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांचं कोणाला आव्हान?
देशातील आरक्षण संपविण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केलं होत. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी एका कार्यक्रमात म्हणाले होते. राहुल गांधींच्या विधानावर त्यांच्या विरोधकांकडून टीका केली जात आहे.
राहुल गांधींच्या भूमिकेशी सहमत आहात का? असा सवाल करत आरक्षणासंदर्भातील भूमिकेवरून पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान दिलं आहे. तर राहुल गांधींनी देशाची गरिमा कमी केल्याचे काम केलं असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज राहुल गांधींच्या मनातलं, पोटातलं ओठांवर आलं आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे त्यांनी देशाची गरिमा कमी केल्याचे काम केले आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, आपल्या संविधानाचा अपमान राहुल गांधींनी करायला नको होता. याबाबतीत त्यांनी खुलासा करायला पाहिजे, अशी मागणी करत पंकजा मुंडे म्हणाल्या राहुल गांधींच्या मित्र पक्षांनी देखील ते राहुल गांधी यांच्याशी सहमत आहेत का? याबद्दलचा स्पष्ट खुलासा केला पाहिजे, असे आव्हानच पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांना दिलं आहे.