Suresh Dhas Video : धसांनी घेतली पोलीस अधीक्षक कॉवत यांची भेट अन् महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भात केली 'ही' मागणी

Suresh Dhas Video : धसांनी घेतली पोलीस अधीक्षक कॉवत यांची भेट अन् महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भात केली ‘ही’ मागणी

| Updated on: Jan 24, 2025 | 5:45 PM

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली आहे. काय झाली दोघात चर्चा?

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी नवनीत कॉवत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्या, अशी मागणी धस यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांना वगळून केस द्या असंही सुरेश धस यांनी म्हंटलय. ‘महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची आज भेट घेतली. गेल्या १५ महिन्यांपूर्वी परळीत महादेव मुंडे यांचा खून झाला. या खूनाचा अद्याप तपास लागला नाही. याचं कारण म्हणजे परळी पोलीस ठाण्यात बहुतेक अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना आकानेच निवडलेलं आहे’,असा थेट आरोपच सुरेश धस यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे देण्यात यावा. एलसीबीचे जे प्रमुख आहेत त्यांना आकाने बसवलं आहे. त्यामुळे एलसीबीच्या प्रमुखाला वगळून या प्रकरणाता तपास एलसीबीकडे द्या, अशी मागणीही सुरेश धस यांनी यावेळी केली. कोण आहेत महादेव मुंडे बघा व्हिडीओ?

Published on: Jan 24, 2025 05:31 PM