Suresh Dhas Video : 'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?

Suresh Dhas Video : ‘मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था…’, सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?

| Updated on: Jan 24, 2025 | 3:59 PM

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करू नये, असं सांगणारी एका पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधिकारी बल्लाळ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. 

बीडचं पोलीस दल बदनाम झालं असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते सुरेश धस यांनी केलं. तर मुन्नी बदनाम हो गयी अशी बीड पोलीस दलाची अवस्था आहे, असा हल्लाबोल सुरेश धस यांनी केला. ‘मिस्टर बल्लाळ देव. प्रभासच्या पिक्चरमध्ये होता बल्लाळ देव. बल्लाळ सारखे वागणारे अनेक लोक बीडमध्ये बरेच झाले. त्यामुळेच हे स्तोम माजलं. बीड जिल्ह्यात हे प्रकार झाले. पोलीस बळ पूर्णपणे बदनाम झालं. मुन्नी बदनाम हो गयी तशी अवस्था आमच्या पोलीस दलाची झाली. त्याचं कारण हेच आहे की बल्लाळ सारखे लोक आहेत’, असं म्हणत सुरेश धसांनी बीडच्या पोलीस दलावरच निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, ‘वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना कराडबरोबर रोहित कांबळे नावाचा त्याचा पीए कसा बसेल याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता. तो व्हिडीओ पाहिला नाही का? वाल्मिक कराड व्हॅनमध्ये बसल्यावर रोहित रोहित लवकर या, असं बल्लाळ बोलताना दिसत आहेत. अरे बापरे काय चाललंय?, असा सवाल सुरेश धस यांनी केला. काही गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले. लातूरचा जेल मागत आहेत. कशासाठी मागतात हे सांगतो. माझ्याकडे माहिती आहे, असा म्हणत सुरेश धसांनी एकप्रकारे इशारच दिलाय.

Published on: Jan 24, 2025 03:59 PM