Suresh Dhas Video : सुरेश धस यांच्याकडून वाल्मिक कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'

Suresh Dhas Video : सुरेश धस यांच्याकडून वाल्मिक कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, ‘घरातूनच 150 फोन जातात कसे?’

| Updated on: Jan 24, 2025 | 2:50 PM

जेव्हा महादेव मुंडेंचा खून झाला त्यावेळेस कराडच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसे काय जातात? याचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणीही सुरेश धस यांच्याकडून कऱण्यात आली.

महादेव मुंडे यांच्या प्रकरणात आता भाजप नेते सुरेश धस यांच्याकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या मुलांवर आरोप करण्यात आला. महादेव मुंडे यांच्या हत्येवेळी वाल्मिर कराडच्या घरामधून फोन कसे जात होते? असा सवाल देखील सुरेश धस यांनी उपस्थित केला. सुरेश धस यांच्याकडून सुशील कराड, श्री कराड यांचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. सुशील आणि श्री कराडनी 150 फोन केले असा आरोप देखील सुरेश धस यांनी केला. ‘रवींद्र सानप हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. ते नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते. राजाभाऊ फड राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणले आणि त्याच्या बरोबर पाच लोक आणखी जॉईंट करून टाका आणि सहा जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका आणि ज्यावेळेस हे महादेव मुंडेंचा खून झाला या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड हे वाल्मिक कराडचे चिरंजीव आहे.’, असे सुरेश धस म्हणाले. तर सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड, गोविंद भताणे आणि भास्कर केंद्र यांच्या मोबाईलवर सतत 100 ते 150 वेळा मोबाईलवर फोन केलेत’, असे आरोपही सुरेश धस यांनी केलेत.

Published on: Jan 24, 2025 02:40 PM