Walmik Karad Call Recording Video : ‘अण्णा, ॐ नमः शिवाय!’, पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल
वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल झाला आहे. आरोपीला मदत करण्यावरून हा संवाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले आहेत. यातील आवाज माझा नाही, याप्रकारे मी गुन्हा दाखल करणार आहे, असे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी म्हटलंय. मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही ९ मराठी करत नाही.
वाल्मिक कराड यांनी बोले आणि काही अपवाद वगळता बीड जिल्ह्याचा पोलिस दल हाले अशीच काही स्थिती बीडमध्ये सध्या काय असा आरोप सध्या वारंवार होतोय त्या मालिकेमध्ये आता एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये कराड एका पोलिस निरीक्षकांना आरोपीला सोडून देण्याचं सांगतोय. व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड आणि बीडचे पोलिस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. फोन कॉल साधारण तीन ते चार महिन्यांपूर्वीचा आहे. अनेक गुन्हे दाखल असलेल्या सनी आठवलेला झुकत माफ द्या असं कराड पीआय बल्लाळ यांना सांगतोय. यावर आपल्याला एसपींशी बोलावं लागेल असं पीआयने सांगितल्यावर माझा फोन आला होता असं एसपींना सांगा असं मोठ्या रुबाबाने वाल्मिक कराड सांगतोय. आता ज्या सनी आठवलेला सोडून द्या म्हणून वाल्मिक कराडने पोलिसांना फोन केला आहे. त्याच आठवलेने Facebook पोस्ट करात कराडवरच गंभीर आरोप केले आहेत. आठवलेच्या दाव्यानुसार तरुण पोरांमध्ये क्रेझ तयार करण्याची कराडची अशीच रणनिती आहे. सनी आठवले म्हणतो की, आधी कराडच्या सांगण्यावरून पोलीस अनेक तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करतात नंतर तेच गुन्हे फोनद्वारे मागे घेतले गेल्यानंतर तरुणांच्या मनात कराड सहानुभूती मिळवतो. धनंजय मुंडे यांचा राईट हँड असलेला वाल्मिक कराडच बीडच्या अनेक भागांमध्ये प्रशासन चालवतो तो सांगेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतात पोलीस त्याच्या घरी जाऊन गुन्हेगार ठरवतात हे कराडवरचे आरोप अशा अनेक व्हायरल क्लिपद्वारे अजून गडद होऊ लागले आहेत.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

