Rajsthan Election Results 2023 : राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसपेक्षा किती जागांवर आघाडी?
काँग्रेसपेक्षा भाजप २८ जागांनी पुढे असून भाजपच सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये हाती आलेल्या कलांनुसार जागांचं अंतर वाढलं असून भाजप १०५ तर काँग्रेस ७७ जागांवर पोहोचलं आहे. त्यामुळे राजस्थानमध्येही भाजप आघाडीवर
मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : विधानसभा निवडणुकीच्या निकालात राजस्थानमध्ये भाजपला बहुमत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या हाती आलेल्या कौलनुसार काँग्रेसपेक्षा भाजप २८ जागांनी पुढे असून भाजपच सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये हाती आलेल्या कलांनुसार जागांचं अंतर वाढलं असून भाजप १०५ तर काँग्रेस ७७ जागांवर पोहोचलं आहे. त्यामुळे राजस्थानमध्येही भाजप आघाडीवर आहे. येथे भाजपने मुसंडी मारली आहे. दरम्यान, राजस्थान येथील उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे आघाडीवर असल्याची बातमी समोर येत असून टोंक विधानसभेसाठी काँग्रेसचे सचिन पायलट आणि भाजपचे अजित सिंह यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तर इतर जे पक्ष आहेत त्यांना सध्या १७ जागा मिळाल्या आहेत.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

