PM Modi | पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत भाजपची मुसंडी; दिल्लीत जल्लोषाची लगबग, सायंकाळी 6.30 वाजता पंतप्रधान मोदी….
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत आता सर्व जागांचे कल समोर येऊ लागले असून, अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः पश्चिम बंगालसह इतर काही राज्यांत भाजपला चांगले यश मिळताना दिसत असल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप मुख्यालयात विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. पक्षाच्या परंपरेनुसार निकालानंतर जल्लोष साजरा करण्याची तयारी सुरू असून, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुख्यालयात दाखल होत आहेत. कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आज सायंकाळी 6.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात येणार असून, ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळणाऱ्या यशामुळे राज्यात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम निकालानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार असले तरी सध्या राजकीय वातावरण तापले असून, सर्वांचे लक्ष पुढील घडामोडींवर आहे.
Published on: May 04, 2026 01:11 PM
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा