Amit Shah Raigad : शिवरायांना अभिवादन करण्यासाठी अमित शाह रोप-वेनं किल्ले रायगडावर… बघा व्हिडीओ
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५ वी तिथीनुसार आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने अमित शाह रायगड किल्ल्यावर दाखल झाले आहेत. रोप वेने अमित शाह हे रायगड किल्ल्यावर पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह आज रायगड दौऱ्यावर असून शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त अमित शाह रायगड किल्ल्यावर दाखल झाले आहेत. रोप वेने अमित शाह हे रायगड किल्ल्यावर पोहोचले. यावेळी अमित शाह यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येणार आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५ वी तिथीनुसार पुण्यतिथी आहे. या निमित्ताने अमित शाह छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. यावेळी अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित आहेत. रायगडावर दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर अमित शाह नेमकं काय बोलतात? याकडे लाक्ष लागलेलं आहे. तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून याच किल्ले रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरू आहे. यासंदर्भात अमित शाह नेमकं काय भाष्य करतात? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आणि शिवप्रेमींसाठी आज रोपवे सुरू राहणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

