Pankaja Munde PA Wife Death : पंकजा मुंडे यांच्या PA च्या पत्नीनं जीवन संपवलं की घातपात झाला? संशयास्पद मृत्यूनं खळबळ
पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. आत्महत्येप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कुटुंबीयांकडून मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विवाहबाह्य संबंध आणि मानसिक छळ हे या घटनेमागचे मुख्य कारण असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की हत्या, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गौरी यांचे पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करून मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. लग्नाला केवळ दहा महिने झाले असताना ही घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनंत गर्जे यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे गौरी गर्जे यांना मानसिक त्रास दिला जात होता. तसेच, नणंदेनेही मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. पंकजा मुंडे यांनीही पोलिसांना योग्य तपास करण्याचं आवाहन केलं आहे.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

