Babanrao Lonikar : बबनराव, तुमचे उपकार महाराष्ट्र कसे फेडणार? ब्रह्मदेव फक्त सृष्टीनिर्माते…लोणीकरच खरे पालनकर्ते!
तुमच्या अंगावरचे कपडे स्वकष्टाचे आहेत की मग त्यामागे सरकार किंवा कुणी सत्ताधारी आमदाराची मेहेरबानी आहे? असा प्रश्न तुम्हाला एका नेत्याच्या विधानावरून पडेल. आपण जणू जनतेला विकत घेतले अशा ठाटात काही सत्ताधारी नेते हल्ली विधान करतायेत. लोणीकर यांना खुद्द फडणवीसांनी समजावण्याचा म्हटलं असलं तरी आपल्या विधानात काही चूक होतं असं लोणीकरांना अजूनही वाटत नाहीये.
सृष्टी करता ब्रह्मदेवासराखा राष्ट्रनिर्माता आणि कर्णासारखी दानशूरता असे दोन्ही गुण ठायी असून सुद्धा महाराष्ट्राला बबनराव लोणीकरांसारख्या असामीची किंमत केळली नाही. बबनरावांच्या अन्वयार्थानुसार ते आणि भाजपच सरकार नसतं तर महाराष्ट्र आज अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेला असता. पोरं बिनकपड्याची अनवाणी पायांनी भटकत असती, पोराच्या बापाला पेन्शन नसतं, पेरणीसाठी पैसे नसते, घरातल्या आई-बहीण आणि बायकोच्या खात्यात पंधराशे रुपयेही आले नसते, हातात मोबाईल सुद्धा नसतात. पण दरीद्री कल्पनेचे हे कटू स्वप्न म्हणून भाग्योदयाची पाहाट व्हावी तसंच महाराष्ट्रात भाजप सरकार येऊन लोणीकर सत्ताधारी झाले आणि त्यांनी महाराष्ट्राच चित्रच बदलून टाकलं.
ब्रह्मदेवाने तर फक्त सृष्टीच बनवल्याची धारणा आहे. पण त्या सृष्टीतल्या लोकांकडे समृद्ध करण्याचं काम भाजप आणि बबनरावांनीच केल्याचं ते सूचवू पाहातायत. म्हणजे भाजपचं सरकार आणि बबनराव सत्तेत येण्याआधी राज्यातली पोरं उघडी फिरत होती. त्यांना कपडे बबनरावांनीच दिले, आधी पोरं अनवाणी फिरायची त्यांना बूट आणि चप्पल सुद्धा भाजप सरकारने दिले. पोराच्या हातात मोबाईल ज्याला बबनरावांच्या भाषेत डबडं म्हणतात ते सुद्धा भाजप सरकारने दिले. त्या पोराच्या आईला पगार बबनरावांनी दिला, पोराच्या बापाला पेन्शनही बबनरावांनी दिलं. त्या बापाच्या पेरणीसाठी पैसे मोदींनी दिले आणि पोराची आई, बायको आणि बहिणीला लाडक्या बहिणीचे पैसे सरकारने दिले, असं लोणीकरांचं म्हणणं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

