Azmi controversial statement : “अबू आझमीचा DNA औरंगजेबाचा…”, ‘त्या’ वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्याची जहरी टीका
अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल एक वक्तव्यकरून आपल्या आकलेचे तारे तोडल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय
समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी काल औरंगजेबाबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि वादाची ठिणगी पडली. विधानभवनाच्या परिसरात अबू आझमी यांनी औरंगजेबांचे कौतूक करत औरंगजेब हा कुशल प्रशासक होता. त्याने अनेक मंदिरे बनवली. तर संभाजी महाराज यांनी कधी धर्मासंदर्भात कधीच कोणतीही लढाई लढली नाही, असा खळबळजनक दावा अबू आझमी यांनी केला आहे. अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. राज्यभरात या वक्तव्यानंतर गदारोळ झाला आणि ठिक-ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली. यानंतर अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून निलंबनाची कारवाई त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार महेश लांडगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘अबू आझमींना निलंबित करण्यात आलं पाहिजे. औरंगजेबासंदर्भात वादग्रस्त विधान करून त्यांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे. त्यांचा मागचा इतिहास पाहता आतंकवादी लोकांसोबत त्यांचा संबंध आहे. अशा लोकांनी संभाजी महाराजांबद्दल बोलणं आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं म्हणजे यांच्या DNA मध्ये काही तरी प्रोब्लेम आहे. त्याचे DNA औरंगजेबाचे आहे’, असं महेश लांडगे म्हणाले.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
