संजय राऊत यांनी आपलं कॅरेक्टर तपासावं, रोहित पवार यांच्या टीकेनंतर केलेल्या आरोपावर कुणाची टीका?
निवडणुकीपूर्वी हिंदू मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. यानंतर संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. चर्चा नको तर वाद हवा, फूट पाडून भाजप भाडणं लावतंय, रोहित पवार यांचा हल्लाबोल
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३ | रोहित पवार यांनी आपला मोर्चा पुन्हा भाजपकडे वळवला आहे. निवडणुकीपूर्वी हिंदू मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. यानंतर संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. रोहित पवारच नाही तर यापूर्वी ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये वाद निर्माण केल्याची टीका काँग्रेसने भाजपवर केली होती. जी टीका रोहित पवार यांनी केली तसाच आरोप संजय राऊत यांनी केला. फायद्यासाठी फूट पाडून भाजप नेहमीच भाडणं लावतंय, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर संजय राऊत यांनी आपलं कॅरेक्टर तपासावं, तेजस आणि आदित्यमध्ये कोण भाडणं लावतंय, असा पलटवार नितेश राणे यांनी केलाय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

