संजय राऊत यांनी आरोप केलेल्या भाजप आमदार राहुल कुल यांना क्लिन चीट
VIDEO | संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्याविरोधात केली होती तक्रार, काय आहे प्रकरण?
मुंबई, 28 जुलै 2023 | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने ज्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, ते भाजप आमदार राहुल कुल यांना दिलासा मिळाला आहे. राहुल कुल यांना राज्य सरकारने क्लिन चीट दिली आहे. पुण्यातील दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराबाबत सरकारने ही क्लिन चीट राहुल कुल यांना दिली आहे. साखर कारखान्यात कोणताही घोटाळा झाला नसल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राहुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात शेकडो रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
Published on: Jul 28, 2023 04:25 PM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

