धनंजय मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, ‘त्या’ निर्णयांची माहिती द्या, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
तत्कालीन कृषीमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या, असं सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहिले. कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला
मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश धस हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तत्कालीन कृषीमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या, असं सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहिले. कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. तेलबियांच्या उत्पादकता वाढीसंदर्भातील निर्णयांची माहिती सुद्धा सुरेश धस यांनी आता या पत्रामधून मागवली आहे. तर २०२० ते २०२५ पर्यंतच्या पत्रव्यवहाराची माहिती द्या, अशी मागणी करत सुरेश धस यांनी प्रधान सचिवांना हे पत्र लिहिले आहे. कापूस, सोयाबीन, तेलबियांची उत्पादकता वाढविण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती द्या, अशी मागणी धसांनी केली आहे. तर खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी आल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. याचबरोबर कृषी मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी यांच्या संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केला आहे.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
