‘इतना हंगामा क्यों…’, मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धस यांचा सवाल
तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण भेटलो, मात्र आपण भेट झाल्याचं नाकारलेलंच नाहीये असं धस म्हणालेत. संतोष देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं धस म्हणालेत.
धनंजय मुंडेंची सुरेश धसांनी भेट घेतल्याचं समोर आलंय आणि जरंगेंपासून अंजली दमानिया आणि संजय राऊतांपर्यंत सर्वच तुटून पडले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड वरून मंत्री धनंजय मुंडेवर आरोप पकडणारे धस दोनदा मुंडेंना भेटलेत. पहिली भेट 15 ते 20 दिवसांआधी मुंबईत बावनकुळे यांच्या घरी झाली. बावनकुळे यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडेंना जेवणाला बोलावलं. त्यानंतर आता चार दिवसांआधी धनंजय मुंडेंच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया झाल्यावर विचारपूस करण्यासाठी गेल्याचं धस यांचं म्हणणं आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस मॅनेज झालेत. धस आधुनिक फितूर असल्याची जोरदार टीका जरंगीनी केली. चार साडेचार तास सुरेश धस आणि धनंजय मुंडे सोबत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणालेत मतभेद असावेत मनोभेद असू नये मनोभेद निपटवा असं सांगितल्याचंही बावनकुळे यांनी माध्यमांसमोर सांगितलय. आता धस आणि मुंडेनी एकत्र काम केल्यास संतोष देशमुख यांना चांगला न्याय मिळेल असं बावनकुळेंचं म्हणणं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी जे आक्रोश मोर्चे निघाले त्यात बीड जिल्ह्यातले सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकाच मंचावर आले. जरांगे ही धस यांच्या सोबत मंचावर होते पण तेच धस आता मुंडेंना भेटल्याने धस मॅनेज झाल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केलाय. गेल्या 20 दिवसांच्या कालावधीत सुरेश धस आणि धनंजय मुंडेमध्ये दोनदा भेट झाली. त्यात एक भेट ही बावनकुळेंनी बोलावलेल्या जेवणासाठीची आणि दुसरी भेट धसांच्या म्हणण्याप्रमाणे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती. पण आता सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही असं संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी म्हटलय.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
