AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suresh Dhas : फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, महादेव मुंडेंचं चामडं, रक्त अन्... सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप

Suresh Dhas : फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, महादेव मुंडेंचं चामडं, रक्त अन्… सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप

| Updated on: Jul 17, 2025 | 12:41 PM
Share

सुरेश धस यांनी विधानभवनाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना महादेव मुंडे प्रकरणी विजयसिंह बांगर यांनी केलेल्या आरोपांबवर थेट भाष्य केले आणि खळबळजनक आरोपही केला

बीडमधील महादेव मुंडे या माणसाला फक्त १२ गुंठ्यासाठी मारलं, असं बीड जिल्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. इतकंच नाहीतर महादेव मुंडेची हत्या करून त्याचं चामडं, हाड, रक्त हे आकाच्या कार्यालयात होतं, असा खळबळजनक आरोपही सुरेश धस यांनी केलाय. सगळ्यांची नावं वाल्मिक कराडचा जुना सहकारी विजयसिंह बांगर याने मीडियासमोर बोलताना तसं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, विधानभवनात बोलत असताना धस म्हणाले, महादेव मुंडेंच्या प्रकरणी आता माहिती समोर येत आहे. त्याप्रकरणात गोट्या गीते, राजू फड, वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा या सर्वांची नावे बाळा बांगरने मिडीयासमोर घेतली. बाळा बांगर हा जो आकाबरोबर असणारा माणूस आहे. त्याने मिडिया समोर हे सांगितलेले आहे.

पुढे सुरेश धसांनी असंही सांगितलं की, बाळा बांगरने असं म्हटलं मी जेव्हा आकाला भेटायला गेलो, तेव्हा त्या माणसाचं चमडं, हाडं आणि त्याचे रक्तही यांच्या ऑफिसच्या टेबलवर होते, हे बाळा बांगर बोललेत. यानंतर त्यांनी तक्रार दिली. त्या ज्ञानेश्वरी ताईंना औषध प्यायची वेळ एसपी कार्यालयासमोर आली. मग त्यात त्या ताईंची काय चूक आहे”, असा सवाल सुरेश धस यांनी केला.

Published on: Jul 17, 2025 12:40 PM