Suresh Dhas Video : जवळचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अटक होताच सुरेश धस एका वाक्यात म्हणाले, ‘त्याने जी चूक केली…’
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून खोक्या भोसलेला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. सतीश भोसले आज पोलिसांना शरण जाणार होता मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
‘अत्यंत चांगली बाब आहे. त्याने जी चूक केली आहे. त्यासंदर्भात त्याला अटक झाली आहे. आता कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.’, असं म्हणत सुरेश धस यांनी सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला अटक केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा बीडच्या आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असून गेले चार ते पाच दिवस तो फरार असल्याची माहिती समोर येत असताना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून खोक्या भोसलेला आज अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांच्या माध्यमातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात सुरेश धस यांना सवाल केला असता त्यांनी त्यावर भाष्य केले आहे. ‘अजिबात नाही. मी कोणत्याही पोलिसाला फोन करत नाही. खोक्याला अटक करा असं मी म्हटलं. त्याने चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई करा असं मी पहिलेच म्हटलं होतं. आता त्याच्यावर कारवाई झाली आहे. जे त्याच्यावर कलमं लागले आहेत. त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल.’, असं सुरेश धस यांनी स्पष्टपणे म्हटलंय.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
