Vijaykumar Gavit : माझे दोनच टार्गेट… शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीये… भाजप आमदार काय बोलून गेले?
नंदूरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिवसेना आमदारांमधील रूसवे-फुगवे समोर आल्याचे पाहायला मिळाले आहे.
माजी मंत्री तथा भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पुन्हा शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे. विजयकुमार गावित जाहीरपणे शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत. एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरा आमदार आमश्या पाडवी आहेत. दरम्यान, विजयकुमार गावित यांनी केलेल्या या विधानामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या वाद एकोपाला पोहोचला असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर विजयकुमार गावित पुढे असेही म्हणाले की, शिंदे गटाचे आमदारांची मस्ती जिरवायची आहे. आमश्या पाडवी यांच्याकडे बारा बंगले आहेत तर त्यांच्या पत्नीकडे चार बंगले आहेत. तरीही आमदार आमश्या पाडवी यांनी बायको आणि मुलाचे नावावर शबरी आणि पंतप्रधान घरकुल योजनेचे लाभ घेतला असल्याचा गंभीर आरोप आमदार गावित यांनी केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?

