बॉलिवूडची धकधक गर्ल Madhuri Dixit लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? भाजप खासदार स्पष्टच म्हणाले…
VIDEO | बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मुंबईत लोकसभेची निवडणूक लढणार? सुरू असलेल्या चर्चांदरम्यान भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले गोपाळ शेट्टी बघा व्हिडीओ
मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असणारी माधुरी दीक्षित ही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मुंबईत लोकसभेची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय आहे. मात्र यावर भाजपचे खासदार गोपाल शेट्टी यांनी भाष्य केले आहे. माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार का? असा सवाल भाजप खासदार गोपाल शेट्टी यांना विचारला असता त्यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. गोपाल शेट्टी म्हणाले, “मला असं वाटतं की, यावर काही भाष्य करणं खूप लवकर होईल. मलापण अनेक जणांचे फोन आले होते. सोशल मीडियावर खूप जोरात बातमी सुरू आहे. पक्ष जे काही निर्णय घेईल, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. मला पक्षाने खूप मोठी संधी मुंबई शहरामध्ये दिली”
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट

