Nishikant Dubey : आधी बरळले आता पलटी, मात्र ‘पटक पटक के मारेंगे’ यावर भाजप खासदार आजही ठाम अन् दिलं नवं आव्हान
'मुंबईत मुकेश अंबानी राहतात, ते कमी मराठी बोलतात हिम्मत असेल तर तिथे जा आणि त्यांना मराठी बोलायला सांगा. त्यांना मारहाण करा.मुस्लिम आहेत किंवा इतर राज्यातील लोकं आहे. हिम्मत असेल तर तिथे जा त्यांना मारून दाखवा', असं चॅलेजही दुबेंनी ठाकरेंना दिलंय.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बिहारमध्ये येण्याचे आव्हान देत जर हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावं, धरून धरून मारू, असं चॅलेंजच दिल्याचे पाहायला मिळाले होते. इतकंच नाहीतर महाराष्ट्राकडे स्वतःच असं काय आहे? महाराष्ट्र तर इतरांच्या भाकरीवर जगतो, असं वक्तव्य करत निशिकांत दुबेनं गरळ ओकली होती. मात्र महाराष्ट्रावर भाष्य करत बरळणाऱ्या निशिकांत दुबेने आता पलटी मारली आहे. आम्ही महाराष्ट्राला पोसतो असं म्हणणाऱ्या दुबेंनी आता आम्ही महाराष्ट्राचं योगदान मान्य करतो, असं म्हणत युटर्न घेतला आहे. यावेळी बोलताना दुबेंनी असंही म्हटलं की, प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान आहे. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. महाराष्ट्राचं अर्थकारणात मोठं योगदान आहे, असं आम्ही मान्य करतो मात्र ‘पटक पटक के मारेंगे’ या वक्तव्यावर आजही दुबे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

