Nishikant Dubey : महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद? थेट संभाजीनगरमधून Audio व्हायरल
'तुमच्यात हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना, तेलगू-तमिळ भाषिकांनाही मारहाण करा, तरच आम्ही समजू की खरंच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहात', असं म्हणत भाजप खासदार दुबेंनी ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं.
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी फोन उचलणं बंद केल्याची माहिती समोर येत आहे. संभाजीनगरमधून रमेश पाटील यांनी थेट भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी फोन केला असून त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. दरम्यान, फोन पर बात नही करते तुम क्या पटक-पटक के मारोंगे? असा खोचक सवाल निशिकांत दुबे यांनी या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे यांना बिहारमध्ये येण्याचे आव्हान देत राज ठाकरेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावं, धरून धरून मारू, असं चॅलेंजच दिल्याचे पाहायला मिळाले होते. तर तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? टाटा, बिर्ला, रिलायन्सचे महाराष्ट्रात युनिट नाहीत. टाटांनी त्यांचा पहिला कारखाना बिहारमध्ये बांधला. तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता? असा सवालही दुबेंनी करत ठाकरेंवर निशाणा साधला होता.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

