Udyanraje Bhosale | स्टेडिअमचं वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे, बैठकीत उदयनराजे भडकले
सातारा क्रीडा संकुलावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले प्रचंड संतापले आहेत. साताऱ्यातील स्टेडियमचं वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे, असा संताप उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. उदयनराजेंचा हा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा एसटी स्टँड नजीक काही वर्षांपूर्वी उभारलेल्या क्रीडा संकुलबाबत संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. चुकीच्या पद्धतीने हे संकुल उभे केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याकाळी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडियमवर भरवल्या जात होत्या. रणजीही झाल्या. तेव्हा ट्रॉफीची मॅचेस घेऊ शकलो असतो. सातारा प्राईम एरिया आहे. स्टँडच्या शेजारी आहे. एवढं असताना संकुल उभारलं गेलं नाही. बी. जी. शिर्केंनी बालेवाडीचं स्टेडियम कॉमन वेल्थसाठी बांधलं होतं. त्यांनी आपल्या संकुलासाठी निघालेल्या टेंडरसाठी फॉर्म भरला होता. हे का सांगतो, हे मीडियात आलं पाहिजे. हे आमदार, खासदार जी सो कॉल्ड माकडं आहेत ना, या सगळ्यांनी त्यातून बोध घ्यायला हवा. राजकारणापलिकडे जाऊन विचार करायला पाहिजे. स्पोर्ट्स आणि इतर ठिकाणी राजकारण आणू नये. इकडे वाट्टोळं करून टाकलं सर्वांचं, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?