Gauri Garje death : श्रीमंताच्या नादी लागू नका, तुमच्या मुली… लेकीच्या अंत्यसंस्कारावेळी बापानं फोडला हंबरडा, बघा VIDEO
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांना पत्नी गौरी पालवेच्या मृत्यूप्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गौरीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे, तसेच विवाहबाह्य संबंध आणि मानसिक छळाचा संशय व्यक्त केला आहे. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी अनंतच्या घराशेजारी अंत्यसंस्कार केले.
पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अनंत गर्जे यांना पत्नी गौरी पालवे यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले आणि शिवडी न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गौरी पालवेच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, गौरीला अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता, जो एका हॉस्पिटल फाईलमध्ये गर्भपात झालेल्या महिलेच्या नावासमोर अनंतचे नाव पती म्हणून पाहून बळावला. गौरीच्या वडिलांनी मुलीला गरिबांच्या घरी द्यावे, पण श्रीमंतांच्या नादी लागू नये असे भावनिक आवाहन केले आहे. गौरीच्या मैत्रिणींनी तिच्या नणंदेवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. पंकजा मुंडे यांनी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...

