Dombivli : काँग्रेस नेत्याला भर रस्त्यात नेसवली साडी, मोंदींच्या ‘त्या’ फोटोमुळं वातावरण तापलं, डोंबिवलीत नेमकं काय घडलं?
डोंबिवली येथे काँग्रेस नेते प्रकाश पगारे यांना भाजप कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात साडी नेसण्यास भाग पाडले. पगारे यांनी पंतप्रधान मोदींचा फोटो मोर्फ केल्यामुळे हा प्रकार घडला.
डोंबिवली शहरात एक वादग्रस्त घटना घडली. काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश पगारे यांना भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर साडी नेसण्यास भाग पाडले. पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो मोर्फ करून तो साडीत दाखवला होता. यामुळे भाजप कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी पगारे यांचा आक्रमक होत निषेध व्यक्त केला. या घटनेमुळे काही काळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Published on: Sep 23, 2025 05:26 PM
Follow Us
Latest Videos
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
