Ravindra Chavan Exclusive : ठाकरे बंधूंची युती ते BMC मध्ये भाजपचा महापौर? भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा प्लॅन काय?
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होणार लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली कबंर कसली आहे. अशातच महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार का? BMC मध्ये भाजपचा महापौर असणार? यावर नवे प्रदेशाध्यक्षांनी नेमकं काय म्हटलं?
भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नुकतीच भाजपाचे नेते तथा केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांनी ही अधिकृत घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याने ते भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष बनलेत. त्यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. यानंतर आज भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टीव्ही9 मराठीशी एक्सक्ल्युसिव्ह संवाद साधला.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंची युती आणि त्यांचं एकत्र येणं हा चर्चेचा मुद्दा ठरला असून आज रवींद्र चव्हाण यांनी देखील ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांची युती झाल्यास त्यांचा नेमका प्लॅन काय असणार? यावर संवाद साधलाय. तर आगामी पालिका निवडणुका असतील किंवा हिंदी-मराठी भाषा वाद यांवरही त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

