महायुतीतील लोकसभेच्या जागावाटपाची मोठी बातमी, भाजप राज्यात ‘इतक्या’ जागा लढवणार
महायुतीतील लोकसभेच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : महायुतीतील लोकसभेच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर शिंदे गट आणि अजित पवार गट 22 जागा लढवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणकीच्या 48 जागांबाबत तीनही पक्षांचे जवळपास एकमत झालं असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जिंकणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल मात्र हा शब्द अंतिम शब्द नसेल असेही त्यांनी म्हटले. शिंदे गट आणि अजित पवार गट 22 जागा एकत्रित लढवतील असेही त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून म्हटले आहे. थोडक्यात तिथे भाजप मजबूत आहे तिथे भाजपचं जागा लढवताना दिसणार आहे.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

