Pune BJP Protest | ओबीसी आरक्षणासाठी पुण्यातही भाजपचं धरणं आंदोलन

ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून आज भाजपने संपूर्ण राज्यात एक हजार ठिकाणी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याचा आरोप करत भाजपने संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला आहे.

ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून आज भाजपने संपूर्ण राज्यात एक हजार ठिकाणी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याचा आरोप करत भाजपने संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला आहे. ठाण्यापासून मुंबई-पुण्यापर्यंत आणि नागपूरपासून औरंगाबादपर्यंत भाजपचा एल्गार आज पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणासाठी पुण्यातही भाजपचं धरणं आंदोलन केलं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी देखील करण्यात आली. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे ओबीसी समाज प्रचंड संतापला आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यात एक हजार ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI