BMC | मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी, 296 दुकानांना नोटीस
मुंबईत मराठी भाषेच्या सक्तीच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील मराठी फलक नसलेल्या दुकानांवर कारवाईची मोहीम राबवण्यात येत असून, आतापर्यंत तब्बल 9 हजार 306 आस्थापनांची तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 296 दुकानांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

महानगरपालिकेकडून देवनागरी लिपीतील मराठी नामफलक सक्तीने लावण्यावर भर दिला जात असून, शहरातील 100 टक्के दुकानांवर मराठी नामफलक झळकावेत यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली आहे. प्रशासनाकडून सातत्याने तपासण्या सुरू असून, नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरोधात पुढील काळात अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मराठी फलक सक्तीच्या या मोहिमेमुळे व्यापाऱ्यांमध्ये हालचाली वाढल्या असून, अनेक दुकानांनी मराठी नामफलक लावण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या राजभाषेचा सन्मान राखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे महानगरपालिकेकडून सांगितले जात आहे.
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..