AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्य 'खतरे में'... बोगस औषधांचा सुळसुळाट अन् महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळ?

आरोग्य ‘खतरे में’… बोगस औषधांचा सुळसुळाट अन् महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळ?

| Updated on: Dec 13, 2024 | 10:52 AM
Share

बीड जिल्ह्यातल्या बोगस औषध प्रकरणानंतर पुण्यातल्या ससून रुग्णालयातही त्याच पुरवठादाराकडून गोळ्या-औषधं आल्याची माहिती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ज्या गोळ्या-औषधांबाबत तक्रार केली जात आहे, त्यांचा वापर ससून रुग्णालयाकडून थांबवण्यात आलाय.

महाराष्ट्रात उघड झालेल्या गोळया- औषधांनी अनेक जिल्ह्यात सुळसुळाट घातल्याचे पाहायला मिळतंय. त्याचेच रोज-रोज नवनवे कारनामे समोर येवू लागले आहेत. राज्यातील बोगस औषधांचे लोण आता पुण्यातील ससून रूग्णालायातही पोहोचल्याची शंका वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बोगस औषध प्रकरणानंतर पुण्यातल्या ससून रुग्णालयातही त्याच पुरवठादाराकडून गोळ्या-औषधं आल्याची माहिती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ज्या गोळ्या-औषधांबाबत तक्रार केली जात आहे, त्यांचा वापर ससून रुग्णालयाकडून थांबवण्यात आलाय. त्या सर्व औषधांची चाचणी एफडीएकडून झाल्यानंतरच त्या पुन्हा वापरात येतील, अशी माहिती ससूनच्या प्रमुखांनी दिली आहे. माहितीनुसार, ठेकेदाराकडून ससून हॉस्पिटलला डायक्लोफिनॅक, मीडिआझोलम, कॅल्शियम, डेक्सामिथसोन आणि मिझोप्रोस्टॉल ही औषधे पुरवली गेली होती. ही औषधे याआधी वापरण्यात आली आहेत. उरलेल्या साठ्यात डायक्लोफिनॅकच्या ४०४० गोळ्या, मीडिआझोलमच्या १४४०, कॅल्शियम १२०, डेक्सामिथसोनच्या ५ हजार आणि मिसोप्रोस्टॉलच्या ७,५०० अशी औषधं शिल्लक होती. हा साठा वापरातून काढण्यात आला असून तपासणीसाठी पाठवला गेलाय. तर दुसरीकडे नांदेडमध्येही बनावट औषध पुरवठा झाल्याचं उघड झाल्यानंतर सरकारी रुग्णालयातल्या १ लाख २८ हजार गोळ्या सील करण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे संबंधित रुग्णालयानं गोळ्या तपासणीसाठी ऑक्टोबर २०२३ ला सरकारच्या लॅबमध्ये पाठवल्या होत्या. मात्र या गोळ्यांमध्ये आवश्यक ते घटक नाहीत याचा रिपोर्ट जवळपास वर्षभरानंतर प्राप्त झालाय.

Published on: Dec 13, 2024 10:52 AM