Adv. Nilesh Ojha : वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
Mumbai High Court : वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलेलं आहे. कोर्टाने माध्यमात आपलोड झालेली ओझा यांची विधानं हटवण्याचे आदेश देखील हटवण्याचे आदेश दिलेले आहेत.
मुंबई हायकोर्टाने वकील निलेश ओझा यांना फटकारलेलं आहे. ओझा यांनी कोर्टावर केलेले आरोप हे न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यासारखं आहे, निलेश ओझा यांनी केलेली वक्तव्यं ही चुकीची आहेत, असं हायकोर्टाने म्हंटलं आहे. यावेळी कोर्टाने माध्यमात आपलोड झालेली ओझा यांची विधानं हटवण्याचे आदेश देखील हटवण्याचे आदेश दिलेले आहेत.
निलेश ओझा यांनी जेव्हा जेव्हा पत्रकार परिषद घेतल्या त्यावेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्यावरती आरोप केलेले होते. या सगळ्या क्लिप आज हायकोर्टात सादर करण्यात आल्या. ओझा यांनी केलेले आरोप कोर्टासमोर ऐकवण्यात आले. त्यानंतर पाच न्यायाधीशांचं जे घटनापीठ बसलेलं आहे त्यांनी आज या प्रकरणाच्या सुनावणीला महत्वपूर्ण सुरुवात झाली.

