Breaking | जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप होणार? पालिकेतील 8 नगरसेवक फुटणार

भाजपचे अजून 8 नगरसेवक नाराज आहेत. हे नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय. यापूर्वी 27 नगरसेवक फुटले. त्या गटासोबत हे 8 नगरसेवक फुटून जाणार आहेत, असंही खडसे म्हणाले.

भाजपचे अजून 8 नगरसेवक नाराज आहेत. हे नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय. यापूर्वी 27 नगरसेवक फुटले. त्या गटासोबत हे 8 नगरसेवक फुटून जाणार आहेत, असंही खडसे म्हणाले. खडसेंच्या या दाव्यामुळे जळगाव भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. खडसेंचा हा दावा खरा ठरला तर तो भाजप आणि गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का असेल. जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र, 27 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करुन शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे सत्तांतर होऊन शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला. महत्वाची बाब म्हणजे जळगाव महापालिकेत महापौर आणि विरोधी पक्षनेतेही शिवसेनेचे आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI