AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | देशात काय घडतंय? दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

Special Report | देशात काय घडतंय? दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 10:54 PM
Share

जम्मू कश्मीरमध्ये आज सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला असून या हल्ल्यात 2जवान शहीद झाले आहेत. तसेच या हल्ल्यात 14 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी 3 पोलीस गंभीर आहेत.

जम्मू कश्मीरमध्ये आज सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला असून या हल्ल्यात 2जवान शहीद झाले आहेत. तसेच या हल्ल्यात 14 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी 3 पोलीस गंभीर आहेत. श्रीनगरच्या जेवन भागात हा हल्ला झाला आहे. सशस्त्र पोलीस दलाच्या 9 व्या बटालियनवर हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळता सुरक्षा दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या भागात नाकाबंदी केली आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. श्रीनगर इथून बस पोलीस हेडक्वार्टरला जात असताना दहशतवाद्यांनी बसवर बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात 14 पोलीस जखमी झाले आहेत. सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.