Nagpur | नागपुरात घोड्यावर बसून नवरीची मिवणूक, वऱ्हाडी मंडळी झाले आश्चर्यचकीत

लग्नमंडपात जाण्यापुर्वी डॉलीने घोड्यावर बसून आपली वरात अत्यंत थाटात  काढली, इतकच नव्हे तर तिचा हा स्वॅग लूक  बघून उपस्थित नातेवाईकांना सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.

नागपूर : नागपुरात एका लग्न समारंभात नवरी चक्क घोड्यावर बसून लग्नमंडपात अवतरली. नवरी मुलीचा हा Swag  बघून उपस्थित वरातींना बसला आश्चर्यचा सुखद धक्का. ही आहे नागपुरातील एका लग्नातील विशेष वरात. साधारणतः लग्न म्हटले तर नवरदेव हा घोडी वर बसून वरतीतून लग्न मंडपामध्ये येत असतो. परंतु नागपुरात एक नवरी घोडीवर बसून लग्नमंडपात पोहोचली. नागपुरातील झिंगाबाई टाकळी परिसरातील अंजनाताई मंगल कार्यालयात 30 नोव्हेंबर 2021 रोजी डॉली  राऊत हिचा विवाह सोहळा आशिष शिंदे या युवकासोबत पार पडला. लग्नमंडपात जाण्यापुर्वी डॉलीने घोड्यावर बसून आपली वरात अत्यंत थाटात  काढली, इतकच नव्हे तर तिचा हा स्वॅग लूक  बघून उपस्थित नातेवाईकांना सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. नागपुरातील ही अनोखी  वरात उपस्थित नातेवाईकांसोबतच  रस्त्यावरील नागरिकांसाठी सुद्धा एक वेगळा कुतूहलाचा विषय निर्माण झाला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI