Buldhana : हेडमास्तरच फुल्ल टाईट… शाळेत प्रार्थना सुरू अन् इकडे मुख्यध्यापकाचा धिंगाणा, बघा VIDEO
बुलढाण्यातील मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा मध्यधुंद अवस्थेतील धिंगाणा समोर आला आहे. प्रार्थनेवेळी मुख्याध्यापक कांबळे हे दारूच्या नशेत विद्यार्थ्यांसमोर आल्याचे चित्र होते. या घटनेनंतर ग्रामस्थांनी मुख्याध्यापक कांबळे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार घडला. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे दारूच्या नशेत शाळेच्या आवारातच धिंगाणा घालत असल्याचे पालकांच्या लक्षात आले आहे. ज्यावेळी मुख्याध्यापक कांबळे दारूच्या नशेत शाळेत दारू पिऊन आले आणि धिंगाणा घालायला लागले तेव्हा शाळेत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते, आणि प्रार्थना सुद्धा सुरू होती.. या संदर्भातील काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. तर ग्रामस्थानी या प्रकाराचा निषेध केला असून शिक्षण विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी ग्रामस्थानी केलीय.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

