महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जागांवरून महायुतीमध्ये तिढा सुटला.... त्यानुसार संदीपान भुमरे, हेमंत गोडसे आणि प्रताप सरनाई यांची लॉटरी लागू शकते. तर या तीनही जागांवरील लोकसभा लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची औपचारिकरित्या घोषणा बाकी
ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जागांवरून महायुतीमध्ये तिढा सुटल्याचे म्हटले जातंय. तर या तिनही जागा शिंदेंच्या शिवेसनेच्या वाटेला जाणार, असी सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार संदीपान भुमरे, हेमंत गोडसे आणि प्रताप सरनाई यांची लॉटरी लागू शकते. तर या तीनही जागांवरील लोकसभा लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची औपचारिकरित्या घोषणा शिंदेंचे मंत्री दीपक केसरकर करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागा शिदेंगटाकडे जाणार आहे. सर्वाधिक रस्सीखेच ही नाशिकच्या जागेवरून सुरू आहे. अशातच तिथे छगन भुजबळांची एन्ट्री झाल्याने महायुतीतील तिनही पक्षांची स्पर्धा वाढली. तर नाशिकची जागा ही प्रभू श्रीरामाच्या धनुष्यबाणासाठी सुटेल असं वक्तव्य नाशिकेचे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे. बघा ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या तिनही जागांवर कोणाची कोणासोबत स्पर्धा?
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

