अपघातात कारमधील एकाचा मृत्यू,5 जण जखमी
ही घटना मध्यरात्री घडल्याने नेमका अपघात कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. लोकनगरी बायपास रस्त्यावर रात्री तीनच्या सुमारास अपघात झाला आहे.
अंबरनाथ – अंबरनाथमध्ये (Ambernath) मध्यरात्री कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना मध्यरात्री घडल्याने नेमका अपघात कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. लोकनगरी बायपास रस्त्यावर रात्री तीनच्या सुमारास अपघात झाला आहे. एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर पाचजण गंभीर जखमी आहेत. त्यापैकी एकाला गंभीर जखमा झाल्या असल्याने उपचारासाठी मुंबईत (Mumbai) आणण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Published on: May 25, 2022 11:38 AM
Follow Us
Latest Videos
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

