मुंबई गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी ‘नीलकमल’ बोट उलटली, बोटीत 30-35 हून अधिक प्रवासी अन्…
मुंबईच्या गेट ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटल्याची माहिती समोर येत आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने जात असताना या दोन बोटींमध्ये धडक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यातील नीलकमल नावाची बोट उलटल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये ३० ते ३५ हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यातील काही जणांना बाहेर […]
मुंबईच्या गेट ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटल्याची माहिती समोर येत आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने जात असताना या दोन बोटींमध्ये धडक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यातील नीलकमल नावाची बोट उलटल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये ३० ते ३५ हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यातील काही जणांना बाहेर काढण्यात आले आहे. नीलकमल नावाची बोट उरण, कारंजा परिसरात उलटल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घडलेल्या घटनेनंतर नेव्ही, जेएनपीटी, कोस्टगार्ड, पोलिसांच्या आणि स्थानिक माछीमारांच्या बोटीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६६ जणांचे रेस्कू करुन वाचवण्यात आले आहे. तर नीलकमल बोटीच्या मालकांनी दिलेल्या माहितीनुसारस नेव्हीची स्पीड बोट आली. त्या स्पीड बोटीने राऊड मारला. त्यानंतर पुन्हा ती बोट आली. नेव्हीच्या त्या बोटीने नंतर आमच्या नीलकमल बोटीला धडक दिली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

