AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Boat Capsized: मुंबईत नौदलाच्या बोटीची स्पीड बोटीला धडक, १३ जणांचा मृत्यू

Mumbai Boat Capsized: गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटी पैकी एका बोटीला नौदलच्या बोटीने धडक दिली. त्यानंतर ही बोट उलटली. या बोटीमध्ये ११०  प्रवासी प्रवास करत होते. त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला.

Mumbai Boat Capsized: मुंबईत नौदलाच्या बोटीची स्पीड बोटीला धडक, १३ जणांचा मृत्यू
नौदलाची बोट
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 18, 2024 | 8:22 PM
Share

Mumbai Boat Capsized: मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात धक्कादायक घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटी पैकी एका बोटीला नौदलच्या बोटीने धडक दिली. त्यानंतर ही बोट उलटली. या बोटीमध्ये ११०  प्रवासी प्रवास करत होते. त्यातील काही जणांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १०१ जणांना वाचवण्यात आले आहे. सात ते आठ प्रवाशी अजून बेपत्ता आहे. नौदलाच्या १४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरु आहे.

दोन बोटींमध्ये टक्कर

मुंबईत गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येत असतात. त्यातील काही पर्यटक गेट ऑफ इंडिया पहिल्यानंतर एलिफंटा येथील गुफा पाहण्यासाठी जात असतात. एलिफंटाला जाण्यासाठी पर्यटकांना बोटीने प्रवास करावा लागतो. बुधवारी दुपारी पर्यटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटी पैकी एका बोटीला नौदलाच्या बोटीने टक्कर दिली. त्यानंतर बोट उलटली.

नीलकमल बोटीच्या मालक राजेंद्र परते यांनी सांगितले की, नेव्हीची स्पीड बोट आली. तिने बोटीला राऊंड मारला. त्यानंतर ती गेली. त्यानंतर पुन्हा ती बोट आली. त्या बोटीने नंतर आमच्या नीलकमल बोटीला धडक दिली.

उलटलेल्या नीलकमल बोटीत ११० प्रवासी

उलटलेल्या बोटीचे नाव नीलकमल असे आहे. या बोटीमध्ये ११० प्रवासी होते. उरण, कारंजा परिसरात बोट उलटल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेव्ही, जेएनपीटी, कोस्टगार्ड, पोलिसांच्या आणि स्थानिक माछीमारांच्या बोटीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर बोटी घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी बचावकार्य सुरु केले. दरम्यान, या घटनेची माहिती आमदारांना मिळाली. त्यानंतर यासंदर्भात सभागृहात प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?