BIG Breaking: मेळाव्यापूर्वी ठाकरे पिता-पुत्रांना झटका, ‘ती’ एक कृती पडली महागात; थेट 300 जणांवर गुन्हा
हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी गेल्या रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक आंदोलन करण्यात आलं होतं, या आंदोलनात राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली. या प्रकरणात ३०० जणांवर गुन्हा दाखल झालाय.
ठाकरे बंधूंच्या मेळाव्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती नको, अशी भूमिका राज्यातील काही पक्ष आणि संघटनांची होती. याला प्रथम मनसेने विरोध केला. यानंतर ठाकरे गटानेही यास नकार दिला. अशातच गेल्या रविवारी मुंबईमध्ये हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली होती. तर या प्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. दिपक पवारांसह २५० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, नितीन सरदेसाई, हर्षवर्धन सपकाळ देखील सहभागी झाले होते. दरम्यान, राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली. मात्र कोणतीही परवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आल्याचा आरोप होत असताना मेळाव्यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

