AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray Brothers : 5 जुलैच्या मेळाव्यानंतर पुढे काय घडणार? ठाकरे बंधू एकत्र येणार की... राऊतांचा संकेत काय?

Thackeray Brothers : 5 जुलैच्या मेळाव्यानंतर पुढे काय घडणार? ठाकरे बंधू एकत्र येणार की… राऊतांचा संकेत काय?

Updated on: Jul 04, 2025 | 11:30 AM
Share

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर येत असल्याने या दोघांची उपस्थिती चर्चेचा विषय आहे. तर पाच तारखेच्या मेळाव्यानंतर सुद्धा पुढच्या काही गोष्टी होतील असे सूचक संकेत संजय राऊतांनी दिलेत.

मुंबईतल्या ठाकरे बंधूंचा मेळावा उद्यावर आलाय. मेळावा ठाकरे बंधूंचा असला तरी त्यात इतर विरोधी पक्षाचे नेते सुद्धा हजर राहणार असल्याची माहिती आहे. मुंबईतल्या वरळी डोंबच्या सभागृहात जवळपास सात ते आठ हजार लोक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हॉल बाहेर रस्त्यावर सुद्धा एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. हिंदी सक्तीच्या जीआर विरोधात आधी ठाकरे बंधूंनी मोर्चांची घोषणा केली होती. पण सरकारने जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजय मेळाव्याच आयोजन करत एकत्र येण्याच ठरवलं. म्हणजेच दोघांनीही एकत्र यायचं हे यातनं सिद्ध होतं आणि संजय राऊतांनी पाच तारखेच्या मोर्चानंतर पुढच्या गोष्टी घडतील असंही म्हटलंय. म्हणजेच वरळीतला मेळावा दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे.

मेळाव्यासंदर्भात एक टीझर सुद्धा जारी करण्यात आलाय. ज्यामध्ये दोन सिंह दाखवले असून एका सिंहाच्या मदतीला दुसरा सिंह जातो त्यावरून नेमकं अडचणीत कोण आहे हे टीझरमधून स्पष्ट होत नाही, असं म्हणत शिंदेंचे मंत्री शिरसाठ यांनी ठाकरे बंधूंना डिवचलंय.

Published on: Jul 04, 2025 11:30 AM