Central Railway : ऐन गर्दीच्या वेळेला प्रवाशांचा संताप, मध्य रेल्वेच्या ‘या’ स्टेशनदरम्यान ट्रॅकला तडे अन् वाहतूक ठप्प
प्रवाशांच्या ऐन कामावर जाण्याच्या वेळेला लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. कर्जत-बदलापूर या स्थानकादरम्यान मोठ्या संख्येने प्रवासी नोकरीसाठी मुंबईत जात येत असतात. मात्र आज वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप होतोय
मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळच्याच वेळी ठप्प झाली असून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय. मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाल्याने नोकरदारवर्गाला ऑफिसला पोहोचण्यास उशिर होणार असल्याने कामाच्या ठिकाणी लेटमार्क लागण्याचे टेन्शन आलंय. मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी ठप्प झाल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वांगणी-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे कर्जत-बदलापूर दरम्यानची अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे रूळाला तडे गेल्याने कर्जत-बदलापूर दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

