Chandrakant Khaire : ‘कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या…’, दानवेंवर खैरे भडकले, आता थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रार
'मी उद्धव ठाकरे यांच्याकडे अंबादास दानवे यांची तक्रार करणार आहे. आमची परवा बैठक आहे. या बैठकीत मी सगळं सांगणार आहे. तुम्ही आम्हाला कचरा समजत आहात का?', असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर हल्लाबोल केला.
छत्रपती संभाजीनगरमधला वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे यांनी दांडी मारली. तर अंबादास दानवे यांच्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला जाणं टाळलं असल्याची चर्चा आहे. तर अंबादास दानवे यांच्याकडून आमंत्रण मिळालं नसल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले. इतकंच नाहीतर अंबादास दानवे यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हणताना अंबादास दानवे यांच्यावर चंद्रकांत खैरे भडकल्याचे पाहायला मिळाले. यावर चंद्रकांत खैरे यांनी दांडी का मारली हे त्यांनाच विचारा असंही अंबादास दानवे म्हणाले. “मला अंबादास दानवे यांनी काहीही सांगितलेले नाही. मी स्पष्टपणे सांगतो. मी हे उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. तो अंबादास हा स्वत:ला मोठा समजतो. तुम्ही आम्हाला कचरा समजत आहात का? अंबादास दानवे हे नंतर आलेले आहेत. नंतर येऊन ते काड्या करण्याचे काम करत आहेत.” अशी सडकून टीका चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर केली.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी

