औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळे रखडले, चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर अनेकवेळा टीका करताना दिसतात. यावेळी मात्र खैरे यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळे रखडले, असं खैरे यांनी म्हटलंय.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर अनेकवेळा टीका करताना दिसतात. यावेळी मात्र खैरे यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळे रखडले, असं खैरे यांनी म्हटलंय. ते औरंगाबाद जिल्ह्यातील सजापूर-करोडी रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. “औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळेच रखडले. रावसाहेब दानवे रस्त्याच्या ठेकेदाराला त्रास देत असल्याचं खुद्द नितीन गडकरी यांनी मला सांगितलं. भाजप खासदरच रस्त्याचा ठेकेदार होता. तरीही रावसाहेब दानवे यांनी त्रास दिला,” असा दावा खैरे यांनी केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI