Chandrakant Khaire : थर्ड क्लास, मूर्ख माणूस… संभाजीनगर आला तर… खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
सुर्याजी पिसाळाची औलाद म्हणजे गोपीचंद पडळकर बाळासाहेब ठाकरे यांना असे म्हणतो का..? पडळकरवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे म्हणत खैरेंनी पडळकरांवर जोरदार पलटवार केलाय.
“उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याचे बहुमत दिले होते. पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली. हे सूर्याजी पिसाळासारखे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे.”, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केली. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘पडळकर असे बोलले म्हणजे त्यांचे थोबाडं काळे करावे लागेल, ते सुर्याजी पिसाळची औलाद म्हणाले म्हणजे….उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांची औलाद आहेत आणि पडळकर त्यांना असं बोलतात का..?’, असा सवाल करत चंद्रकांत खैरे यांनी जहरी पलटवार केलाय. पुढे खैरे असेही म्हणाले, पडळकर बडबड करणारा थर्ड क्लास माणूस आहे. पडळकर कधी संभाजीनगर आला तर सरळ करून टाकेल, पडळकर याला काही अक्कल आहे का? त्याची औकात आहे का? पडळकर एकदम मूर्ख माणूस आहे, असा घणाघात करत त्यांनी पडळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

