“कुठे गेले पाटील?” Jayant Patil यांना Chandrakant Patil यांचा सवाल

सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

गेल्या अठरा महिन्यात सरकार कशाच्याही बाबतीत गंभीर होत नाही. केंद्राकडे मदत पाठवण्याआधी आपली तिजोरी खोलून वाटून टाकायची असते. मागच्या दुष्काळात आम्ही 6 हजार 700 कोटींच पॅकेज दिलं होतं. पण हे सरकार राज्याचं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवलं जातं. परंतु यांना कुठलीही तत्परता नसून कोणतंही व्हिजन नाही. फक्त ढकलाढकली सुरू आहे. या संकटात कोल्हापूरचे पालकमंत्री कुठे आहेत?, असा सवालही त्यांनी केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI