OBC Reservation | भाजपचं राज्यव्यापी आंदोलन, कोल्हापुरातून चंद्रकांत पाटील LIVE

भाजपने ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं या विरोधात (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं. या आंदोलनावर चंद्राकांत पाटीलांनी आपली प्रतिक्रिया देत तीव्र आंदोलनाचा इशार दिला आहे.

ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्याविरोधात भाजपने (BJP OBC agitation) आक्रमक पवित्रा घेत, राज्यभर आज चक्काजाम आंदोलन सुरु केलं. कोल्हापुरात देखील चंद्रकांत पाटील यांच्य अध्यक्षतेखाली आंदोलन सुरु असून त्याठिकाणाहून पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने समाजात ताणतणाव निर्माण झाला आहे. जोवर ओबीसीना न्याय मिळात नाही तोवर भाजपा रस्त्यावर उतरुन आंदोलन करतच राहिल असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI