AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या 'या' 4 नेत्याचं एका दशकानंतर सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली, महायुतीत 42 मंत्री तर 11 नाराजीराव?

भाजपच्या ‘या’ 4 नेत्याचं एका दशकानंतर सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली, महायुतीत 42 मंत्री तर 11 नाराजीराव?

| Updated on: Dec 17, 2024 | 11:15 AM
Share

भाजपकडून ४ मंत्री झालेले असे नेते आहेत त्यांनी जवळपास एक दशकांनंतर सत्तेत मंत्री कमबँक केलं आहे. तर मंत्रिपदाचा पत्ता कापल्याने नाराजीरावांच्या संख्येतही भर पडताना दिसतेय.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं नाही म्हणून लोकांनी निवडून दिलेले तीन नेते थेट नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून आपापल्या गावी परतल्याचे पाहायला मिळाले. भाजपकडून ४ मंत्री झालेले असे नेते आहेत त्यांनी जवळपास एक दशकांनंतर सत्तेत मंत्री कमबँक केलं आहे. तर मंत्रिपदाचा पत्ता कापल्याने नाराजीरावांच्या संख्येतही भर पडताना दिसतेय. अनेक वर्षांनंतर मंत्रिमंडळात परतलेल्या चेहऱ्यांमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये सत्तेत ऊर्जामंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा एका दशकानंतर यांचा मंत्रिपदावर कमबॅक झाला आहे. २०१४ मध्ये महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या पंकजा मुंडे २०१९ मध्ये विधानसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांना अनेक पदांनी हुलकावनी दिली मात्र आता १० वर्षांनी पुन्हा महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झाल्यात. २०१४ मध्ये पर्यटनमंत्री असलेले जयकुमार रावल नंतर युतीच्या सत्तेत पद नव्हते मात्र आता पुन्हा मंत्री झालेत. यासोबतच १९९५ साली युतीच्या सत्तेत ते मंत्री होते नंतर सत्तेत मंत्रिपदाविना कार्यरत होते. १४ वर्षानंतर त्यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे यांची लाल दिव्याच्या गाडीची प्रतिक्षा आता संपली असल्याचे बोलले जात आहे.

Published on: Dec 17, 2024 11:15 AM